Friday, May 29, 2026
Latest NewsPUNETOP NEWSUncategorized

चिंताजनक : पुण्यात आज कोरोना रुग्ण संख्येचा स्फोट

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रासह पुण्यातही कोरोना रुग्ण संख्येचा आलेख वाढता आहे. आज तर पुण्यात कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट झाल्याची परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वी शे, दोनशेवर असलेली कोरोना रुग्ण संख्या आज तब्बल हजाराच्या घरात पोहोचली आहे. आज दिवसभरात 1 हजार 104 नवीन कोरोना पॅाजिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. तर 151 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. दरम्यान, काल दिवसभारात केवळ 444 नवीन कोरोना पॅाजिटिव्ह रुग्णांची नोंद झाली होती. ती संख्या आज दुपटी पेक्षा जास्त झाली आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 12 हजार 689 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 5 लाख 144 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 1रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे शहरातील 1 रुग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत पुणे शहरात 9119 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरामध्ये सध्या 3790 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह  आहेत. त्यापैकी 89 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 6819
स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली  आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading