Tuesday, November 3, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पुणे जिल्ह्यातील पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद राहणार

पुणे : झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्ण संख्या आणि ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता. लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने मुंबई पाठोपाठ आता पुणे जिल्ह्यातही पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा 30 जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. तसेच लासिकरणासाठी नववी आणि दहावीचे वर्ग सुरू राहणार आहेत.

उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ आदी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज पुण्यात कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, मागील आठवड्या पासून दिवसांगणीक कोरोना रुग्ण संख्येचाआलेख वाढतच आहे. यापार्श्वभूमीवर सोमवारी मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर आज पुणे जिल्ह्यातील पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून हे वर्ग ऑनलाईन पद्धतीने सुरू राहणार आहेत.

 

Leave a Reply