शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथे 10 हजार पाणी बॉटलचे वाटप
पुणे – शौर्यदिना निमित्त भीमाकोरेगांव येथे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांसाठी नववर्षाचे औचित्य साधून शिक्रापूर येथील माऊलीनाथ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल यांच्यावतीने दहा हजार पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी माऊलीनाथ हॉस्पिटलचे संचालक डॉ.पवन सोनवणे,डॉ.अजिंक्य तापकीर,डॉ.दीपक पाटील,डॉ.हेमंत दातखिळे,डॉ.वृषाली दातखिळे,डॉ.पृथ्वीराज चव्हाण,शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.काशीद ,शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मोरे,डॉ.तायडे तसेच शिक्रापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष मामा खैरे,ग्रामपंचायत सदस्य पूजा ताई भुजबळ,सामाजिक कार्यकर्ते सतीश कांबळे उपस्थित होते. या विधायक उपक्रमाबद्दल स्थानिक नागरिक तसेच राज्यभरातून आलेल्या आंबेडकरी अनुयायांनी माऊलीनाथ हॉस्पिटल व राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल यांचे आभार व्यक्त केले.
