Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई होणार – गृह मंत्री दिलीप वळसे पाटील

पुणे : सुप्रीम कोर्टाने दहा पंधरा दिवसापूर्वी बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  परंतु वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने दीलेल्या निर्देशानुसार राज्य सरकारने जे निर्णय घेतले. त्यानुसार जिल्हा अधिकाऱ्यांनी निर्णय घेत बैलगाडा शर्यत रद्द केली. सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा नक्कीच आनंद देणारा आहे. पण जे कोरोनाचे नियम पाळत नाहीत त्यांच्यावर नक्की कारवाई होणार, असे म्हणत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत केले आहे.

पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. दिलीप वळसे-पाटील म्हणाले, नेते असू किंवा कोणी असू नियम सर्वांना सारखेच अटी व नियम पाळले पाहिजेच.

महिलांवर काहीं वेबसाईट आक्षेप घेत जे लिहल जात त्यावर पाटील म्हणाले, महिलांवर काहीं वेबसाईटवर आक्षेप घेत जे लिहिलं जात ते एकदम चुकीचे आहे. पोलीसांनी वाहतुकीसाठी घातलेल्या बंधनाच पालन केलं आहे. त्या वेबसाईटवर मुंबई सायबर मध्ये गुन्हा दाखल झाला असुन योग्य कारवाई करणार असे पाटील म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading