fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNE

चिंताजनक : आज  दिवसभरात पुणे शहरात  524नवीन कोरोना रुग्ण

पुणे : शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची संख्या वाढली असून पुणे शहरामध्ये  गेल्या 24 तासात 524 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 79रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आज पर्यंत 5 लाख 11 हजार 411 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 99 हजार 509 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 1 तर पुणे महापालिका हद्दी बाहेरील 1 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9118 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरामध्ये सध्या 2514 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह  आहेत. त्यापैकी 99 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 6786
स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली  आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading