कोरोना निर्बंधांबाबद मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील – राजेश टोपे
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांमध्ये भयानक वाढ झाली आहे. राज्यात आज एकाच दिवसांत पाच हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांनी गर्दी टाळी पाहिजे, असे आवाहन राज्य आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. तसेच कोरोनाच्या वाढत्या पादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्य कोविड टास्क फोर्सची आज बैठक झाली. त्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राजेश टोपे काय म्हणाले –
- कोरोना रुग्णांच्या दुपटीने वाढण्याचा वेग वाढला आहे.
- दोन दिवसात गर्दी टाळण्यासाठी योग्य निर्णय घेतला जाईल
- ओमिक्रॉनच्या समूह संसर्गाचाही धोकाही कायम
- शाळेत लसीकरण सुरू करण्याची राज्यशासनाची तयारी
