Saturday, May 9, 2026
Latest NewsPUNE

न्यू इयर सेलिब्रेशनसाठी पुणे महानगरपालिकेने काढले नवीन आदेश

पुणे : गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरीच राहून साध्या पध्दतीने नववर्षाचे स्वागत करावे लागणार आहे. पुणे महापालिकेने राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार न्यू इयर सेलिब्रेशनसाठी नवीन आदेश जारी केले आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

पुणे महापालिकेने जारी केलेले नवीन आदेश – 

– शहरातही फटाक्यांची आतिषबाजी, कोणत्याही धार्मिक सांस्कृतिक / कार्यक्रमाचे आयोजन    करण्यास बंदी

– रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यावर बंदी

– नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध      आसन क्षमतेच्या ५० टक्के तर खुल्या जागेतील कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या २५ टक्के मर्यादा    घालून देण्यात आली आहे.

– या ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही, मास्कचा वापर अनिवार्य राहिल आदी सूचनांचे    काटेकोर पालन करण्याचे आदेश

– नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading