fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला

सिंधुदुर्ग : भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन आज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे आणि गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे नितेश राणेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.

या प्रकरणी नितेश राणे यांना जामीन मिळवण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात जाऊ. तोपर्यंत नितेश राणे यांना पोलिसांकडे हजर होण्याची गरज नाही, असे नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे.

नेमक प्रकरण काय आहे ?

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकी दरम्यान शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. या घटने प्रकरणी संतोष परब यांनी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी नितेश राणे यांनी अर्ज दाखल केलेला आहे. संतोष परब यांच्याबाजूने शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading