मुंबईत कोरोना रुग्णांचा उद्रेक; दिवसभरात 3671 कोरोना बाधितांची नोंद
मुंबई : मुंबईत आज कोरोना रुग्ण संख्येचा उद्रेक झाला आहे. आज दिवसभरात मुंबईत तब्बल 3671 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर महिना अखेरीस ही संख्या ५० हजारांवर पोहचण्याची शक्यता असल्याचे मत मुंबईचे पालक मंत्री अस्लम शेख यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेचे टेन्शन वाढले आहे.
सध्या मुंबईत 11 हजार 360 अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. त्यातल्या त्यात दिलासादायकबाब म्हणजे आज मुंबईत कोरोनामुळे एकाही मृत्युची नोंद झाली नाही. दरम्यान, काल मुंबईत 2510 नवे रुग्ण आढळून आले होते.
#CoronavirusUpdates
३० डिसेंबर, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण- ३६७१
२४ तासात बरे झालेले रुग्ण-३७१
बरे झालेले एकूण रुग्ण-७४९१५९
बरे झालेल्या रुग्णांचा दर-९६%एकूण सक्रिय रुग्ण-११३६०
दुप्पटीचा दर-५०५ दिवस
कोविड वाढीचा दर (२३ डिसेंबर-२९ डिसेंबर)-०.१४%#NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) December 30, 2021
