Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRA

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ३१ डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील इयत्ता ११ वी, १२ वी तसेच १२ वी नंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे.

२०२०-२१ व २०२१-२२ या दोन वर्षाच्या कोरोना-१९ च्या प्रादुर्भाव कालावधीमध्ये शैक्षणिक संस्था, महाविद्यालये प्रत्यक्ष बंद असल्या तरी ऑनलाईन प्रणालीद्वारे शिक्षण सुरू होते. या कालावधीत ऑनलाईन प्रणालीद्वारे शिक्षण पूर्ण केले आहे अशा विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे शिक्षणासाठी सहामाही ७५ टक्के उपस्थितीचे संस्था, महाविद्यालयाचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे, असेही डावखर यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading