बोगस भरती प्रकरण : मांगडेवाडी गावातील सर्व आरोग्य कर्मचारी काम बंद आंदोलन करणार
पुणे : महानगरपालिकेत नव्याने सामील झालेल्या 23 गावांमध्ये झालेले बोगस भरती प्रकरण सध्या गाजत आहे. प्रशासनाकडून याबाबत कारवाई सुरू करण्यात केली आहे. या पार्श्वभूमीवर मांगडेवाडी गावा मधील सर्व आरोग्य कर्मचारी काम बंद आंदोलन करण्याच्या परित्रात असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कात्रज घाट कचऱ्याच्या विळख्यात अडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बोगस नोकर भारती प्रकरणामुळे कर्मचारी धास्तावले असून पालिकेत या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतील याची शाश्वती नसल्याने याआधीच २१ समाविष्ट गावांतील आरोग्य सेवकांनी काम बंद आंदोलन केले होते. मात्र मांगडेवाडी- भिलारेवाडी येथील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा देऊन कात्रज घाटात परिररात स्वच्छता काम सुरू ठेवले होते. या कर्मचाऱ्यांनी विनावेतन सहा महिने मांगडेवाडी भिलरवाडी परिसरात व गावात स्वच्छता तसेच कात्रज घाट स्वच्छतेच काम हे सेवक करत होते. मात्र आता जिल्हा परिषद केवळ २०१७ पूर्वी भरती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीस मान्यता देणार असल्याची चर्चा सध्या रंगत असल्याने,या गावांच्या लोकसंख्येनुसार किमान ७० कर्मचारी भरती करणे आवश्यक होते. परंतु नियमानुसार ३५ टक्के खर्च भागवून येथील ग्रामपंचायतीने केवळ ५३ लोक ग्रामपंचायत टप्याटप्याने आणि आवश्यकतेनुसार घेतले. त्यातही आरोग्य कर्मचारी १२ आहेत. या दोन गावांतील लोकसंख्या आणि कात्रज घाटात स्वच्छतेसाठी अधिक सेवकांची आवश्यकता आहे. आता जिल्हा परिषदेने २०१७ पूर्वीचीच भरती मान्य केली. तरी दोन्ही गावांत फक्त ४ सेविका असतील. त्यामुळे याचा विरोध करण्यासाठी हे कर्मचारी काम बंद आंदोलन करणार आहेत
