Monday, June 22, 2026
Latest NewsPUNE

महानगरपालिका बोगस पदोन्नतीची चौकशी करणार

पुणे : राज्यात बोगस भरतीचे तसेच पेपर फुटीची प्रकरण गाजत असताना पुणे महापालिकेत कर्मचाऱ्यांनी बोगस पदविका मिळवून पदोन्नती घेतल्याचे आरोपांची चर्चा सध्या मोठ्याप्रमाणात आहे. यामध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप केला जात आहे. आता यासर्व प्रकारची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी केली जाणार आहे त्यासंदर्भात माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

महापालिकेत पदोन्नती मिळालेल्या ४० जणांची यादी जाहीर पालिकेतर्फे जाहीर केली आहे, त्यामध्ये १८ जणांनी जेआरएन राजस्थान विद्यापीठातून इंजिनिअरिंग डिप्लोमा केला आहे. यामध्ये ११ आरोग्य निरिक्षक, १ अतिक्रमण निरिक्षक, १ कनिष्ठ अभियंता विद्युत, १ विद्युत पर्यवेक्षक, १ इलेक्ट्रिशन, २ लिपिक टंकलेखक, १ बत्तीवाला आहे. यावर हरकत घेण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती, ती कमी करून केवळ सात दिवस देण्यात आली. त्यामुळे यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप यापूर्वी आम आदमी पक्षाने केला आहे.

महापालिका सेवा अधिनियमानुसार ‘एआयसीटीई’ची मान्यता असलेल्या महाविद्यालयातूनच अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका प्राप्त केली  असेल तरच पदभरतीसाठी हे उमेदवार पात्र ठरत असतात. मात्र या कर्मचाऱ्यांनी ज्या संस्थेची पदविका सादर केल्या आहेत. त्या ‘एआयसीटीई’ची मान्यता !असलेल्या विद्यालयाच्या नाहीत.त्यातच हे कर्मचारी पुण्यात काम करतात मात्र  त्यांनी आसाम, राजस्थान, लातूर, सोलापूर येथील पदविका सादर केल्या आहेत. या पदविका डिस्टन्स एज्युकेशनमधून घेता येत नाही. महापौर कार्यालयातील एका कर्मचाऱ्यानेही अशीच पदविका मिळवून पदोन्नती घेतली आहे, त्यामुळे यामध्ये भाजप, राष्ट्रवादीतील संबंधित लोकांनी लाभ घेतला आहे. याप्रकरणी महापौरांनी प्रशासनाने चौकशी करावी असे सांगितले असले तरी अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे म्हणाले, “महापालिकेने विधी विभागाचा अभिप्राय घेऊन बढती दिली आहे. पण यात अनियमितता असल्याचा आरोप केला गेल्याने याप्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी केली जाणार आहे. त्यांच्या चौकशीत जर पदोन्नती अयोग्य ठरली तर संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्यामुळ पदावर पाठवले जाईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading