पुणे महापालिकेतील 18 हजार कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले, कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी
पुणे: महापालिकेतील तब्बल 18 हजार कामगारांचे डिसेंबर महिन्याचे वेतन रखडले आहे. यामुळे कामगारांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. वेतन रखडलेल्या कामगारांमध्ये काही ‘क’ श्रेणीतील कामगारांचा देखील समावेश आहे. वेळेत पगार न झाल्याने कर्मचाऱ्यांना सध्या आर्थिक चणचणीला सामोरं जावं लागत आहे.
अनेक कर्मचाऱ्यांनी हप्त्यावर घरे किंवा इतर वस्तू घेतल्या आहेत. परंतु कर्मचाऱ्यांना पगारच न मिळाल्याने त्यांना हप्ते वेळेत भरता आले नाहीत. यामुळे कामगार संघटनांकडून तातडीने कर्मचाऱ्यांचे पगार करण्याची मागणी केली जात आहे.
