Tuesday, September 15, 2026
Latest NewsPUNE

भगवानगड संस्थान आळंदी येथे रक्तदान शिबिर संपन्न

आळंदी: स्व गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त भगवानगड संस्थान आळंदी येथे वंजारी सेवा संघ व वेगवेगळ्या सामाजिक संघटना यांच्या संयुक्त प्रयत्नाने रक्तदान शिबिर घेण्यात आले, यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष कायदा आघाडी – ॲड. संजय सावंत पाटील, गोविदराव घोळवे – सचिव भगवानगड, संजय अप्पा घुंडरे – आध्यात्मिक आघाडी व इतर मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमेचे पुजा करण्यात आले, भगवानराव साखरे यांचे विशेष सहकार्य या कार्यक्रमात लाभले.

उपस्थित मान्यवरांना ॲड. संजय सावंत पाटील यांनी संबोधण्यात आले रक्तदान शिबिर घेणे म्हणजेच स्व. गोपीनाथराव मुंढे साहेबांची खरं समाधान होईल असा उपक्रम राबवणे तसेच या माध्यमातुन आपण जनतेला रक्ताचा पुरवठा करणे ही भाग्याची व अभिमानाची बाब आहे असे म्हटले.. यावेळी श्रीनिवास बडे, आविनाश बोरुंदीया, योगिताताई नागरगोजे- नगरसेविका, ॲड. एस.एस.आघाव,  माऊली थोरवे, संभाजीराव शिरसाट, विलास सांगळे, प्रा आगाव, वनवे, दिपक गाडगे, उमाकांत सनम, दिपक नागरगोजे, शरद आढाव, नितीन सांगळे, अमोल गिते, डाँ नारायण जायभाये, सोनवणे, शितल सांगळे, कांचन बनवे, सावळेराम, अमोल गिते, आदी मान्यवर उपस्थित होते.

असे उपक्रम महाराष्ट्रात सर्व मतदारसंघात व्हावी हिच खरी साहेबांना श्रदाजंली असेल अशी ईच्छा पुणे जिल्हाध्यक्ष कायदा आघाडी – ॲड. संजय सावंत पाटील यांनी व्यक्त केली. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading