fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNE

राज ठाकरे यांचा दौरा पक्षबांधणीसाठी – बापू वासगावकर

पुणे: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवस पुणे दौऱ्यावर होते. त्यावर त्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन प्रत्येक कार्यकर्त्याची व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. राज ठाकरे यांचा दौरा पक्षबांधणीसाठी होता, अशी माहिती मनसेचे नेते बापू वासगावकर यांनी दिली.

बापू वासगावकर म्हणाले, राज ठाकरे यांनी या तीन दिवसात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची स्वतः संवाद साधला. राज सकाळी उठले की डायरेक्ट ते रात्रीच घरी यायचे. त्यांनी या तीन दिवसाच्या दोऱ्यात प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी जाऊन संवाद साधून त्यांच्याबरोबर नास्ता व जेवण केले.

रुपाली पाटील ही आमची छोटी बहीण

मनसेचे माजी नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेत बापू वासगावकर व वसंत मोरे
हे पक्षात असल्यामुळे मी पक्ष सोडत आहे याचे उत्तर मी लवकरात लवकर देईल. असे रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या होत्या. त्यावर रूपाली यांनी आमच्याबरोबर दहा-पंधरा वर्षे काम केले आहे.
तिने जरी आमच्यावर आरोप केले असले. तरी आम्ही त्याच्यावर काही उत्तर देणार नाही .ती आमची छोटी बहीण आहे असे वासगावकर म्हणाले

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading