Friday, June 5, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

शीना बोरा जिवंत! : इंद्राणी मुखर्जीचा दावा

मुंबई : शीना बोरा हत्याकांड. (Sheena Bora) प्रकरणात आतापर्यंत वेगवेगळ्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. आता प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने (Indrani Mukherjee)  एक धक्कादायक दावा केला आहे. सीबीआयला  या बाबत तिने पत्र लिहिले असून शीना जीवंत असल्याने पत्रात म्हटले आहे. 

२०१२ साली झालेल्या या घटनेत इंद्राणी मुखर्जीने आपली मुलगी शीना बोरा हीचा खून केल्याचं समोर आलं होतं. मात्र आता इंद्राणी मुखर्जीने CBI च्या संचालकांना पत्र लिहून शीना बोरा जिवंत असल्याचं म्हटलं आहे. या पत्रात तिने लिहिले की, “काही दिवसांपूर्वीच तुरुंगात भेटलेल्या एका महिलेने आपल्याला सांगितलं की, तिला काश्मीरमध्ये शीना बोरा भेटली होती.” त्यामुळे तिने सीबीआयला काश्मीरमध्ये शीना बोराचा शोध घेण्याचं आवाहन केलं आहे. या पत्राव्यतिरिक्त, शीना बोराने विशेष सीबीआय न्यायालयासमोर एक अर्ज देखील दाखल केला आहे. यावर देखील लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading