पतीला लैंगिक समस्या; पत्नीला जबरदस्तीने मित्रांशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले
बारामती : येथील एका गावातून अतिशय विचित्र घटना समोर आली आहे. पतीला लैंगिक समस्या असल्याने त्याने स्वत:च्या पत्नीलाच स्वत:च्या मित्रांशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडल्याची निर्लज्ज पनाचा कळस असणारी घटना घडली आहे. या प्रकरणी 24 वर्षीय पिडीतेने फिर्याद दिली असून बारामती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पर्यंत सादर प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील पती पत्नीचे 2016 मध्ये झाला आहे. मात्र लग्नानंतर वर्षभरातच पतीला लैंगिक समस्या असल्याचे कळाले. यावर उपाय म्हणून या विकृत आरोपी पतीने स्वत:च्याच पत्नीला आपल्या मित्रांशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पडले. पत्नीने नकार दिल्यास तो तिच्यावर अत्याचार करीत असे. शेवटी असह्य झाल्याने पत्नीने हा सर्व प्रकार आपल्या माहेरी जावून सांगितला अन् 10 डिसेंबरला बारामती पोलिस स्टेशनमध्ये सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, पत्नीला मित्रांशी शारीरिक संबंध ठेवताना बघून पतीच्या लैगिंक भावना जागृत होतील आणि त्यानंतर तो बायकोशी शारीरिक संबंध ठेवू शकेल, असा विकृत विचार यामागे असल्याचे आरोपी पत्नीने पोलिस जबाबत म्हटले आहे.
