Friday, June 26, 2026
Latest NewsPUNE

वाढदिवसाचा खर्च टाळून कोरोनाने मृत्यू झालेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत

येरवडा : आज येरवडा भागातील अशोक नगर,माणिकनगर येथील कोविड मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात आली. येरवडा भागातील सामाजिक कार्यकर्ते मंगेश गोळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा उपक्रम राबविण्यात आला. स्वतःचा वाढदिवस साजरा करण्याऐवजी त्याकरिता होणारा निरर्थक खर्च टाळून कोविड मृत व्यक्तीच्या कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी करण्यात येत असलेल्या आर्थिक मदतीचे सर्व स्तरातून कौतुक होते आहे.

आपण आपल्या भागातील नागरिकांचे दुःख न विसरता त्यांचे आपण काहीतरी देणे असतो याची जाण ठेवली पाहिजे. याच माध्यमातुन यातुन उतराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. तसेच यापुढेही या कुटुंबाना शक्य ती मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे यावेळी गोळे यांनी सांगितले.

या उपक्रमाचे आयोजन मंगेश गोळे मिञ परिवारा तर्फे करण्यात आले होते. यावेळी मंगेश गोळे, पापडसिंग बावरी, रमेश गव्हाणे, सिंधुताई गोळे, सागर कांबळे,मदन बावरी,फय्याझ पाशा,शिवा खत्री,भोलेनाथ माने,गणेश ढोकले, विकास सोनावणे, सागर बावरी,अनिल खेत्रे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास सोनावणे यांनी केले व आभार गणेश ढोकले यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading