Friday, June 26, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

बैलगाडा शर्यत पुन्हा राज्यात मोठ्या उत्साहाने भरवल्या जाणार -महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवत शर्यतींना सशर्त परवानगी दिली आहे. सात वर्षांनंतर आता राज्यात बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार असून राज्यात पुन्हा मोठ्या उत्साहाने भरवल्या जातील, अशा भावना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर व्यक्त केल्या. 

पुण्यात एका कार्यक्रमामध्ये आले असता त्यांनी प्रसार माध्यमांना ही प्रतिकिया दिली. थोरात म्हणाले, बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने काही अटी आणि नियम घालून परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यात परत बैलगाडा शर्यत परत चालू होणार आहे. त्यावर बैल सुद्धा आनंद घेतात व शेतकरी सुद्धा आम्हाला बैलगाडा शर्यतीवर बंदी घालणे कधीच योग्य वाटले नाही. ज्यानी ही शर्यत पुन्हा सुरू व्हावी म्हणून प्रयत्न केले त्यांचे अभिनंदन.

आरोग्य भरती व म्हाडा पेपर फुटी वर विविध आरोपीची नावे घेतली जात आहेत. त्यावर थोरात म्हणाले,ज्या आरोपींनी हे पेपर फोडी केली आहे. त्यांच्या शोध घेऊन त्याच्यांवर कठोर कारवाई केली जाईल असेही थोरात म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading