Wednesday, October 14, 2026
Latest NewsPUNE

कन्नड संघाच्या वतीने येत्या ६ जुलै पासून कन्नड भाषा प्रशिक्षण वर्गांचे आयोजन

पुणे  : कन्नड भाषा शिकण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी पुण्यातील कन्नड संघाच्या डॉ कलमाडी श्यामराव कन्नड मिडीयम हायस्कूलच्या वतीने सोमवार दि. ६ जुलै पासून कन्नड भाषा वर्गाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ कलमाडी श्यामराव कन्नड मिडीयम हायस्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योती कडकोळ यांनी दिली आहे.

कर्नाटक आणि महाराष्ट्र या शेजारील राज्यांमधील भाषिक व सांस्कृतिक संबंध अधिक दृढ व्हावेत तसेच इच्छुकांना कन्नड भाषा शिकण्याची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने यंदाही कन्नड भाषा प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात येणार आहे,  अशी माहिती ज्योती कडकोळ यांनी दिली.

त्या म्हणाल्या, “या उपक्रमांतर्गत ‘कन्नड कलिका वर्ग’ आणि ‘प्रगत कन्नड कलिका वर्ग’ असे दोन स्तरांवरील अभ्यासक्रम राबविण्यात येतात. हे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येते.  गेल्या दोन वर्षांत या प्रशिक्षण वर्गाना विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून  यंदाही या प्रशिक्षण वर्गांचा लाभ विद्यार्थी मोठ्या संख्येने घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यंदापासून या अभ्यासक्रमाची परीक्षा मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणार असून, अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाच्या वतीनेच प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

सदर भाषा प्रशिक्षण वर्ग हे डॉ कलमाडी श्यामराव कन्नड मिडीयम हायस्कूल, एरंडवणे येथे आयोजित करण्यात येणार असून या वर्गांची वेळ आठवड्यातून तीन दिवस सायं ५.३० ते ७ दरम्यान असेल. जुलै  २०२६ ते मे २०२७ दरम्यान हे प्रशिक्षण वर्ग सुरु राहतील.

सदर अभ्यासक्रम सशुल्क आहे. 

या प्रशिक्षण वर्गांसाठीची नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संस्थेच्या पूजा पाटील ९६९९१२७६७८ व पूजा पुजारी ९६०७६६८५२९ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहनही डॉ कलमाडी श्यामराव कन्नड मिडीयम हायस्कूलच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading