विरोधकांच्या मतदार संघात ‘विकास-निधी’ मिळत नसेल.. तर ‘सविनय कायदेभंग व असहकार आंदोलनाची’च गरज..! काँग्रेस चा इशारा..!
पुणे : महाविकास आघाडी’च्या जाहीरनामा व ध्येय – धोरणांवर’ व प्रस्थापित मोदी सरकार’च्या विरोधात मतदान करून, जनतेने निवडून दिलेल्या खासदारांचा ‘भाजप-महायुती प्रवेश’ हा तेथील जनतेशी विश्वासघात व प्रतारणा असून.. संबंधित मतदार संघातील खासदार हे माध्यमांचे समोर, त्यांना ‘विकास निधी मिळत नसुन कामे होत नसल्याची’ कारणे देत पक्षांतर केल्याचे.. समर्थन करणे हे ‘सत्ताधाऱ्यांची पोल खोल असुन, भाजप – एनडीए कडून संबंधित मतदार संघातील जनतेप्रती सुड उगवण्याचा निंदनीय प्रकार असून, असंविधानक देशद्रोही कृत्य असल्याची कठोर टिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी निवेदनाद्वारे केली.
ते पुढे म्हणाले की, एकीकडे सरकार म्हणते सबका साथ, सबका विश्वास मात्र कृतीतून सत्ताधारी पक्ष हा सापत्नपणाची वागणूक देत असल्याचे सांगीतले.
संबंधित मतदार संघातील जनतेने, निवडणूकीद्वारे भाजप-महायुती विरोधात मतदान करून, सत्तेवर जाण्यासाठी ‘पर्यायी पक्ष व लोकप्रतिनिधींची निवड करण्याची स्पष्ट पसंती मतदानाद्वारे दर्शवली असून’ लोकशाहीचे कर्तव्य बजावले आहे.
दुसऱ्या अर्थाने, तेथील जनतेने दर्शविलेल्या पसंती नुसार व केलेल्या मतदानानुसार संबंधित पक्ष सत्तेवर न येऊ शकल्यास, तो पक्ष वा निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे सत्तापक्षाच्या मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्याचे, भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्याचे, व सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याचे कर्तव्य चोख बजावतील याच अपेक्षेने तेथील मतदारांनी कौल दिला असल्याचे स्पष्ट आहे..!
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणीत इंडीया आघाडी’ (३१) तर भाजप एनडीए (१७) जागी निवडून दिल्याने.. राज्यात भाजप महायुती विरोधी कौल स्पष्ट केला आहे. मात्र तरीही अशा प्रकारे ‘विरोधी खासदारांच्या’ मतदार संघात “विकास निधी न देणे” हे केवळ तेथील जनतेच्या सुड उगवण्या पुरते मर्यादित नसून देशात.. प्रथम क्रमांकाने राष्ट्रीय महसुल व जीएसटी देणाऱ्या महाराष्ट्र विरोधी द्रोह असल्याची प्रखर टिका देखील महाराष्ट्र काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
*देशात सर्वाधिक महसूली उत्पन्न देणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेच्या वाट्यास, विकास निधी न देण्याची’ सापत्नपणाची, आकसाची व खुन्नशी ची वागणूक येत असेल तर काँग्रेस_मविआ ती खपवून घेणार नाही, तर प्रसंगी महाराष्ट्रातील जनता सत्तापक्ष ‘भाजप एनडीए विरोधात’ सविनय कायदेभंग व असहकार आंदोलन पुकारेल, असा इशारा ही काँग्रेस’चे वरीष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिला..!
