राज्यात बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी
नवी दिल्ली : देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवत शर्यतींना सशर्त परवानगी दिली आहे. सात वर्षांनंतर आता राज्यात बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार आहे.
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत सुनावणी झाली. यामध्ये बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने काही अटी आणि नियम घालून परवानगी दिली आहे. तसेच हे प्रकरण पाच सदस्य खंडपीठाकडे जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील चार वर्षांपूर्वी घातलेली बंदी उठवत असल्याचा निकाल दिला. त्यामुळे राज्यातील बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यातील बैलगाडा शर्यतीला एक प्राचीन परंपरा लाभली आहे. बैलगाडा शर्यत हा राज्यातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यत सुरू करण्याची मागणी जोर धर होती. तर दुसरीकडे प्राणीप्रेमी मात्र, या बैलगाडा शर्यतीला विरोध करत आहेत.
