Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

रुपाली पाटील ठोंबरे यांचा अखेर राष्ट्रवादी कॉँग्रेस मध्ये प्रवेश

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेने मधील गटबाजीला वैतागून रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यातच रुपाली पाटील यांनी पक्षाला धक्का दिला. त्यानंतर आता रुपाली पाटील ठोंबरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. मुंबईच्या राष्ट्रवादी कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, मी मनसेचा राजीनामा देत शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात मला राष्ट्रवादीत प्रवेश दिला त्याबद्दल मी आभारी आहे. अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते. पालकमंत्री अजित पवारांची भेट घेतल्यानंतर सतत त्यावर पक्षात आक्षेप घेतला जात होता. पालकमंत्री म्हणून अजित पवारांनी कधीही पक्षीय भेदभाव केला नाही. मात्र माझ्याच पक्षातील अनेकांना ते खटकत होते. मी ज्या पद्धतीने लोकांच्या समस्या सोडवत होते तसेच यापुढे मी काम करणार आहे. यापुढे पुणे शहरात भव्य मेळावा घेऊन त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतलेला दिसेल असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, मनसेच्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्यासोबत मनसेच्या लावण्या शिंदे, वंदना साळवी, मनिषा सरोदे, मनिषा कावेडिया, प्राजक्ता पाटील, प्रिया सूर्यवंशी पाटील, अभयसिंह मांढरे, अजय दराडे यांनी रुपाली पाटील यांच्यासह मनसेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading