Sunday, November 1, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

अंनिस राज्यस्तरीय अधिवेशनात पार पडला वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा

पुणे : महाराष्ट्र अंनिसची कोरोंना महामारीच्या काळात तब्बल दोन वर्ष न होऊ शकलेले राज्य कार्यकारिणीचे अधिवेशन ११-१२ डिसेंबर २०२१ रोजी पुण्यातील आझम कॅम्पस मध्ये पार पडले. तब्बल २१ जिल्ह्यातील १७५ पेक्षा जास्त कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने यासाठी आले होते. महाराष्ट्र अंनिसचा वार्षिक पुरस्कार प्रदान सोहळा सुद्धा याच अधिवेशनात पार पडला.

मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, मासूम संस्थेच्या संस्थापक मनीषा गुप्ते आणि अंनिस ट्रस्टचे दीपक गिरमे या सर्वांनी पुरस्कार प्रदान केले. सुधारककार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार २०२१ मा. प्राचार्य सुनीलकुमार लवटे, कोल्हापूर यांना देण्यात आला. सुधाकर आठल्ये ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार हा संतराम कराड, अंबाजोगाई यांना आणि वसंतराव टेंकाळे, लातूर यांना देण्यात आला. भटक्या-विमुक्त जाती-जमाती प्रबोधन पुरस्कार विनायकराव चव्हाण, इचलकरंजी यांना देण्यात आला. सावित्रीमाई फुले पुरस्कार २०२१ हा विजयंताई श्रीखंडे, नागपूर यांना देण्यात आला. सुधाकर आठल्ये युवा कार्यकर्ता पुरस्कार २०२१ हा उदयकुमार कुऱ्हाडे, येवला, नाशिक यांना देण्यात आला. प्रभा पुरोहित, मुंबई यांना महाराष्ट्र अंनिस जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. रोख रक्कम, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह हे पुरस्काराचे स्वरूप होते.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत चार महत्वपूर्ण ठराव सर्वसंमतीने मंजूर झाले.ते पुढीलप्रमाणे— १) ‘भटक्या विमुक्त जाती जमाती व आदीवासी समुदायामध्ये अंनिसचे कार्य वाढवणे.
२) ‘छद्म विज्ञान विरोधात संघर्ष तीव्र करणे.
३) समाजाचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करणे.
४)जादूटोणाविरोधी कायदा व सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा यांचे नियम करावेत म्हणून शासनाशी पाठपुरावा करणे. सर्व ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

या अधिवेशनात राज्य कार्यकारीणीचे प्रवीण देशमुख, फारूक गवंडी, राहुल थोरात, मिलिंद देशमुख, मुक्ता दाभोलकर, हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार, अण्णा कडलसकर, अरुण बुरांडे, श्रीपाल ललवाणी, अशोक वानखेडे, प्रकाश घादगिने, नरेंद्रकूमार कांबळे, शाम महाजन, सुनील स्वामी, अनिल वेल्हाळ असे अनेक वरिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply