Wednesday, September 16, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

Pune – राज ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी मनसेला धक्का; रुपाली ठोंबरेंचा राजीनामा

पुणे:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या  नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी पक्षातील सर्व पदांचा व पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.

त्यांच्याकडे मनसेच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. पक्षांतर्गत वादामुळे त्यांनी मनसेला रामराम ठोकला आहे.
त्यामुळे ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुणे शहरात मोठे खिंडार पडले आहे. रुपाली पाटील या मनसेच्या एक निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. विशेष म्हणजे राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. पुढील दोन दिवस राज ठाकरे आहेत पुणे जिल्हा आणि पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. त्याआधीच पाटील यांनी राजीनामा दिला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading