Monday, November 2, 2026
Latest NewsPUNE

मेट्रोला बालगंधर्वाच्या पार्किंगची जागा देण्या संदर्भात प्रस्ताव लवकरच शहर सुधारणा समिती समोर येणार

पुणे : मेट्रोच्या कामासाठी बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरातील पार्किंग ची जागा मेट्रोसाठी देण्यात येणार आहे.चारचाकी पार्किंगच्या इथली १३१ चौरस मीटर जागा महामेट्रोला दिली जाणार आहे. यासंदर्भात प्रस्ताव लवकरच शहर सुधारणा समितीच्या समोर मांडण्यात येणार आहे.

दरम्यान बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव सुरू आहे मात्र त्यास अजून मूर्तस्वरूप आलेले नाही. भविष्यात हा प्रकल्प हाती घेतल्यास मेट्रोच्या भूमिगत पाण्याच्या टाकीचा अडथळा होणार नाही. असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

सध्या वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाचे काम सध्या सुरू आहे. नदीपात्रामध्ये मेट्रोचे खांब टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, त्यावर सध्या गर्डर टाकण्यात येत आहेत. दरम्यान संभाजी महाराज उद्यान येथे मेट्रोचे स्थानक असल्याने तेथून पेठांमधील नागरिकांना मेट्रो वापरता यावी यासाठी पूल बांधला जाणार आहे. त्याचेही काम नुकतेच नदीपात्रात सुरू झाले आहे.संभाजी उद्यान येथील मेट्रो स्टेशनचे काम करताना मेट्रोला लागणारे दैनंदिन पाणी वापरासाठी टाकी बांधावी लागणार आहे.

त्यासाठी महापालिकेने संभाजी उद्यानातील नदीच्या कडेची ४८० चौरस मीटर जागा महामेट्रोला देण्याचा निर्णय मार्च २०१९ मध्ये घेतला होता.मात्र भाग नदीच्या लगतचा असल्याने राष्ट्रीय हरित लवादाची परवानगी नसल्यामुले बांधकाम करता येणार नाही, असा आक्षेप उद्यान विभागाने घेतला होता . त्यानंतर जागा बदलीसाठी मेट्रोने महापालिकेकडे प्रस्ताव टाकला आहे.

Leave a Reply