अभाविपकडून बिपिन रावत यांना श्रद्धांजली
पुणे: अभावीपकडून गरवारे महाविद्यालयात भारतीय सैन्य दलाचे प्रमुख, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल. बिपिन रावत यांना कडून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी अभाविपचे व महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
अभाविपचे डेक्कन चे महानगर मंत्री यशराज फडके म्हणाले,भारतीय लष्कराचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत यांचे प्रवास करत असलेल्या लष्करी हेलिकॉप्टरचा अपघात होऊन तमिळनाडूतील कुन्नूर येथे दु:खद निधन झाले. जनरल रावत हे व्हिआयपी हेलिकॉप्टरने कोईंबतूरहून दिल्लीला निघाले होते. मात्र कुन्नर येथे पोहचल्यानंतर त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला.अपघात झाला त्यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह आणखी १४ सहकारीही प्रवास करत होते. या अपघातात काहींचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सीडीएस बिपीन रावत यांना तातडीने तामिळनाडूच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान बिपीन रावत यांचे निधन झाले. त्यांना अभाविप तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
