जनरल बिपीन रावत व त्यांच्या सहकाऱ्यांना अभाविप तर्फे श्रद्धांजली
पुणे:भारतीय लष्कराचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत यांचे प्रवास करत असलेल्या लष्करी हेलिकॉप्टरचा अपघात होऊन तमिळनाडूतील कुन्नूर येथे दु:खद निधन झाले. जनरल रावत हे व्हिआयपी हेलिकॉप्टरने कोईंबतूरहून दिल्लीला निघाले होते. मात्र कुन्नर येथे पोहचल्यानंतर त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला.अपघात झाला त्यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह आणखी १४ सहकारीही प्रवास करत होते. या अपघातात काहींचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सीडीएस बिपीन रावत यांना तातडीने तामिळनाडूच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान बिपीन रावत यांचे निधन झाले.
सीडीएस बिपिन रावत यांनी आपल्या आयुष्यातील ३७ वर्षे लष्करासाठी समर्पित केली. आता त्यांच्याकडे आणखी अनेक जबाबदाऱ्या होत्या. देशाच्या सुरक्षा मंत्र्यांच्या मुख्य सल्लागारांपैकी ते एक होते. त्यांनी गोरखा बटालियनपासून सुरुवात केली. गुरखामध्ये असताना त्यांनी लष्कराच्या अनेक पदांवर क्रॉप्स, जीओसी-सी, दक्षिण कमांड, आयएमए देहरादून, लष्करी ऑपरेशन्स डायरेक्टोरेट लॉजिस्टिक्स स्टाफ ऑफिसर म्हणून काम केले.
जनरल रावत यांनी सैन्यात अनेक पदांचा कार्यभार स्वीकारला. ते लष्करप्रमुख झाले, त्यानंतर त्यांची भारतातील पहिली सीडीएस अधिकारी म्हणूनही नियुक्ती झाली. बिपीन रावत यांनी केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही सेवा दिली आहे. ते यूएन मिशन ऑफ काँगोमध्ये सहभागी होते आणि त्याच वेळी त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर सेवा देण्याची संधी मिळाली. या ठिकाणी त्यांनी 7000 लोकांचे प्राण वाचवले. बिपिन रावत यांनी 31 डिसेंबर 2019 रोजी लष्करप्रमुख पदाचा राजीनामा दिला आणि देशातील पहिले CDS अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. भारतीय सीडीएस अधिकारी बनलेली बिपिन रावत हे पहिली व्यक्ती होती. CDS म्हणजेच संरक्षण कर्मचारी हे अधिकारी आहेत जे लष्कर, हवाई दल आणि नौदल यांच्यातील समन्वयासाठी काम करतात आणि संरक्षण मंत्री आणि गृहमंत्र्यांचे मुख्य सल्लागार असतात.
तामिळनाडूच्या कुन्नूर येथे झालेला अपघात हा देशाला हादरवणारा अपघात ठरला आहे. सीडीएस बिपीन रावत व त्यांच्या सहकाऱ्यांच्या निधनाने भारतीय सुरक्षा दलाचे मोठे नुकसान झाले. अशी प्रतिक्रिया अभाविप महाराष्ट्र प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी दिली आहे. अभाविप जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत व अन्य सहकाऱ्यांच्या दु:खद निधनावर शोक व्यक्त करीत आहे.
