Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

मार्केटयार्ड ब्लॉक काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न

पुणे : काल (5 डिसेंबर) सायंकाळी सुहाग मंगल कार्यालय येथे मार्केट यार्ड ब्लॉक काँग्रेस कमिटीतर्फे प्रभाग क्रमांक 28, 36, 37 ची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीचे आयोजन मार्केटयार्ड ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष- रमेश सोनकांबळे व महिला अध्यक्ष सीमाताई महाडिक तसेच निरीक्षक  चेतन अग्रवाल, सुभाष थोरवे व आपले ज्येष्ठ नेते द. स. पोळेकर यांनी केले होते. विशेष मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्राचे सह प्रभारी सोनालजी पटेल व महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभय छाजेड व माजी महापौर दिप्ती चौधरी तसेच पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सोनाली मारणे, माजी नगरसेवक बंडू नलावडे हे सर्व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

या बैठकीमध्ये मार्गदर्शन ऐकण्याकरिता सर्व आदरणीय माजी नगरसेवक व काही शहर पदाधिकारी व तिन्ही प्रभागांचे वार्ड अध्यक्ष तसेच मान्यवर कार्यकर्ते व बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांना येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ताकद आपल्या प्रभागांमध्ये वाढविण्याबाबत बहुमुल्य मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमानंतर सर्वांसाठी चहा व नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading