Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

ओमिक्रॉनमुळे पुणे प्रशासन सतर्क; नागरिकांचे ट्रेसिंग व टेस्टिंग सुरू

पुणे : देशासह राज्यातही कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटचे रूग्ण आढळल्याने भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. डोंबिवलीत 1 तर पुण्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे 7 रूग्ण आढळले. 7 पैकी 6 रूग्ण हे एकाच कुटुंबातील असल्याने आता पुणे प्रशासनही सतर्क झाले आहे.
ओमिक्रॉनचा  फैलाव रोखण्यासाठी पुणे प्रशासनाच्या हालचालींना वेग आला आहे. आजपासून पुण्यात टेस्टिंग आणि ट्रेसिंगला सुरूवात करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांनी दिली. तसेच पुण्यतील रूग्णालयांना बेड आणि ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचे आदेशही महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

ओमिक्रॉन पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचं आजपासून ट्रेसिंग आणि टेस्टिंग केलं जाणार आहे. ओमिक्रॉन प्रकारचे रूग्ण आढळून येताच जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याची मोहिम हाती घेतली आहे. पुण्यात आजपासून ट्रेसिंग आणि टेस्टिंग सुरू होत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांनी दिली आहे. तर टेस्टिंग आणि ट्रेसिंग सोबतच रूग्णालयात पुरेसे बेड, ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचे आदेशही भगवान पवार यांनी दिले आहेत. ओमिक्रॉनचा धोका बघता प्रशासनाकडून सतर्कतेची पाऊलं उचलली जात आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading