Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

इतिहासातून प्रेरणा देणारे उपक्रम महत्वाचे : वनिता वागसकर

पुणे : ‘इतिहास घडविण्यासाठी तो नीट अभ्यासणे गरजेचे असते, तसा अभ्यास होण्यासाठी किल्ले स्पर्धेसारखे प्रेरणा देणारे उपक्रम उपयोगी ठरतील ‘, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीच्या पुणे शहर प्रमुख वनिता वागसकर यांनी केले .

रविवारी पर्वती येथे किल्ला स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले .त्यावेळी वागसकर बोलत होत्या. यावेळी विजेत्या स्पर्धकांना मनसे शहराध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे, मनसे महिला आघाडी शहराध्यक्ष वनिता वागसकर यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.

पर्वती विधानसभा मतदारसंघातील महिला नवनिर्माण सेना उपविभाग अध्यक्ष नाझ इनामदार ,
व सतिश खांबालकर , पुणे शहर चिटणीस यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती.किल्ला स्पर्धेचे बक्षिस वितरण झाले. यावेळी मनसे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या भागामध्ये असे सातत्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करून लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. अशा कार्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत, असे वनिता वागसकर यांनी सांगितले

विकी अमराळे, गणेश नाईकवडे, अस्मिता शिंदे, हेमा सट्टे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading