दूरशिक्षणच्या एम.कॉम च्या परीक्षा वेळापत्रकात बदल
पुणे : ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट’ च्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षा व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशालेकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने विद्यापीठाने एम.कॉम च्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. याबाबतची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा प मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली.
विद्यापीठाच्या दूरशिक्षणच्या मास्टर्स ऑफ कॉमर्स च्या प्रथम व व्दितीय वर्षाच्या परीक्षा ७ ते १० डिसेंबर दरम्यान घेण्याचे नियोजन होते मात्र याच कालावधीत ५ ते २० डिसेंबर दरम्यान ‘सीए फाऊंडेशन’ परीक्षा होणार असल्याने विद्यापीठाच्या दुरशिक्षणच्या एम.कॉम च्या परीक्षा पुढे ढकलत २१ ते २४ डिसेंबर या कालावधीत घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. याबाबतचे सविस्तर वेळापत्रक दूरशिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
