सुनिता वाडेकर यांनी डांबरीकरण करून मोठा अपघाती खड्डा त्वरित बुजवला
पुणे : भाऊ पाटील रोड बोपोडी येथील मुख्य रस्त्यावर खुप मोठा खड्डा पडल्यामुळे वाहतुकीस वारंवार अडथळे व अपघात होत होते. या परिस्थिती ची समक्ष पाहणी करून पुण्यनगरीच्या उपमहापौर व प्रभाग क्रमांक 8 औंध बोपोडी च्या स्थानिक कार्यक्षम नगरसेविका सुनिता परशुराम वाडेकर यांनी स्वता लक्ष देऊन पथ विभागाचे अधिकारी यांना तातडीने सांगून भाऊ पाटील रोड बोपोडी या ठिकाणाचे डांबरीकरण करून हा मोठा अपघाती खड्डा त्वरित बुजवला .
हे काम करून घेताना पुणे मनपाचे रोड पथ विभागाचे अधिकारी आयु.चंद्रकात गवळी साहेब व मधेसाहेब, व रिपब्लिकन पक्षाचे बोपोडी अध्यक्ष आण्णा आठवले, आप्पासाहेब वाडेकर व लक्ष्मन बहिरट व या विभागातील स्थानिक नागरिक उपस्थित होते.
