मी होणार सुपरस्टार शोमध्ये यश मिळाल्याबद्दल राजेश घुमे आणि दिपक वारूळे राष्ट्रवादीतर्फे सत्कार
पुणे: कसबा पेठ भोई आळी परिसरातील समिक्षा राजेश घुमे आणि वारजे माळवाडी भागातील नेहूल दिपक वारूळे या जोडीने स्टार प्रवाह या मराठी वाहिनी वरील मी होणार सुपरस्टार ! जल्लोष डान्सचा ! या शो मध्ये महाराष्ट्राचे विजेतेपद मिळवून प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल त्यांचा श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,कसबा विधानसभा मतदारसंघा च्यावतीने माझ्या व नगरसेवक मा.प्रदिप गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.त्याप्रसंगी अनेक पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते.
