भाजप कडून महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याचे कटकारस्थान – नवाब मलिक
पुणे : महाविकास आघाडीचे संघर्षयोद्धा, राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. आझम कॅम्पस, कॅम्प, पुणे 1 येथे सायंकाळी ६ वाजता हा सत्कार समारंभ पार पडला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून सूडबुद्धीने अनेकांवर कारवाई होत आहे. या सत्कार समारंभास संबोधित करतांना ना.मलिक साहेब म्हणाले की,” सरकारच्या स्थापनेपासून भाजप कडून हेतुपुरस्सर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बदनामी व खोटे आरोप करत प्रतिमा मलिन करण्याचे कटकारस्थान सुरू असून यां सर्व यंत्रणांना उघडे पडण्याचे काम पवार साहेबांचा शिलेदार म्हणून मी पार पाडली. या लढाईमध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांची भूमिका व प्रेम मला प्रेरणादायी आहे. महाविकास आघाडीच्या वतीने माझा जो सम्मान केला त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.”
नवाब मलिक आक्रमक भूमिका घेत भाजपला सडेतोड उत्तर देत आहेत. महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना यामुळे लढण्याची ऊर्जा मिळत आहे अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.
या सत्कार सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप,शिवसेना शहरप्रमुख .संजय मोरे, गजानन थरकुडे, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अभय छाजेड,माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, आमदार सुनील टिंगरे,आमदार चेतन तुपे,जेष्ठनेते अंकुश काकडे,विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ आदिंसह प्रवक्ते प्रदीप देशमुख , समिर शेख महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते.
नवाब मलिक म्हणाले, ईडीने शरद पवारांना नोटीस पाठवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने एक बैठक आयोजित केली होती..याला तोंड कसं द्यायचं यावर चर्चा सुरू झाली..अनेकांनी वकिलांना बोलवा असं सांगितले.. पण मी तेव्हाच सांगितले होते की हा कायदेशीर लढाई नाही तर राजकीय लढाई आहे.तेव्हा शरद पवारांनी सांगितले की काय करायला पाहिजे. तेव्हा मीच सांगितले की ईडीच्या ऑफिसात जाणार असल्याची घोषणा करा.त्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याची घोषणा केली. इतकी वर्षे भाजप शिवसेनेच्या मानगुटीवर बसली होती.म्हणून उद्धव ठाकरेंचं ऑपरेशन करावं लागलं.जेव्हा उद्धव ठाकरेंनी हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी उचलून बाजूला फेकलं.आणि ते निवांत झाले आहे.असेही नवाब मलिक म्हणाले.
