अखिल भारतीय विद्यार्थी परिषद-संस्कारांचे विद्यापीठ नितीन गडकरी
लातूर: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित Youth Leader Conclave राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडले.या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली . विद्यार्थ्यांनी देखील मोठ्या संख्येने हजेरी लावली.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद लातूर शाखेच्या वतीने Youth Leader Conclave या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यात क्रमशः तीन सत्र पार पडले.प्रथम सत्रात उद्घाटन झाले व स्वाधीनता के ७५ वर्ष हा विषय मांडण्यात आला.हे सत्र अभाविपचे क्षेत्रीय सह-संघटन मंत्री राय सिंह जी यांनी मांडले.दुसऱ्या सत्रात लक्ष्मीकांत कर्वा यांनी उद्योजकता विषयाची मांडणी केली.तिसऱ्या सत्रास माननीय नितीन जी गडकरी वक्ते म्हणून लाभले.युवक नेतृत्व व आत्मनिर्भर भारत या विषयावर मार्गदर्शन करताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही संस्कारांच विद्यापीठ आहे असा विशेष उल्लेख त्यांनी केला.त्याच बरोबरीने जुन्या आठवणींना उजाळ देत नव युवकांना प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण कसे करावे.याचे देखील मार्गदर्शन केले.
याप्रसंगी उद्घाटक राजश्री महाविद्यालयाचे प्राचार्य महादेव गव्हाणे,अभाविप महाराष्ट्र प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे, महानगर अध्यक्ष प्रा डॉ. शिवप्रसाद डोंगरे ,महानगर मंत्री प्रसाद मुदगले , कार्यक्रम प्रमुख श्रेयस कुलकर्णी आदी उपस्थित होते.यावेळी पोलिस कर्मचारी ,पत्रकार बांधव उपस्थित होते. कार्यक्रमासाठी लातूर शहरातील विविध महाविद्यायांमधील ५० रुपये नोंदणी शुल्क देवून ७५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
