Sunday, November 1, 2026
Latest NewsPUNE

आज दिवसभरात पुणे शहरात कोरोनाचे  97 नवीन रुग्ण

पुणे : शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची संख्या वाढली असून पुणे शहरामध्ये  गेल्या 24 तासात 97 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 93 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 67 हजार 96 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 96 हजार 865 इतके रुग्ण बरे झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे पुण्यात गेल्या 24 तासात एकही कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत पुणे शहरात 9103जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 828रुग्ण अ‍ॅक्टिव्ह  आहेत. त्यापैकी 101रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 5330 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली  आहे.

Leave a Reply