Saturday, October 31, 2026
Latest NewsPUNE

बोपोडीच्या उर्दू माध्यमिक हायस्कूलमध्ये अकरावी, बारावीचे वर्ग सुरू होणार 

पुणे : पुणे महापालिकेच्या बोपोडी उर्दू माध्यमिक हायस्कूलमध्ये २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता अकरावी आणि बारावीचे सुरु करण्यास आज स्थायी समितीने मान्यता दिलई. स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

रासने म्हणाले, मुख्य सभेच्या मान्यतेनंर हा प्रस्ताव राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. राज्य शासनाची मान्यता मिळाल्यानंतर पुणे महापालिका आणि स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन वर्ग चालविण्यात येतील.

बावधन खुर्द येथील र्इ-लर्निंग स्कूलच्या कामासाठी निधी मंजूर

बावधन-कोथरुड डेपो क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत बावधन खुर्द येथे र्इ-लर्निंग शाळेचे उर्वरीत काम पूर्ण करण्यासाठी १ कोटी ७२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

Leave a Reply