Saturday, October 31, 2026
Latest NewsPUNE

स्वच्छ’च्या कर्मचार्यांना मिळणार मदर बॅग, स्कार्फ आणि पादत्राणे

पुणे : कंत्राटदारीच्या विरोधात निषेध व्यक्त करणाऱ्या स्वच्छच्या कर्मचाऱ्यांना पालिकेकडून स्कार्फ, पादत्राणचे  गाजर दाखवण्यात आले आहे. स्वच्छच्या मूळ मागणीला हात न घालता पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने  ‘स्वच्छ’च्या कचरा वेचकांना मदर बॅग, पादत्राणांचे जोड आणि स्कार्फ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी पालिकेच्या स्थायी समितीने ४७ लाख ५१ हजार रुप चा निधी मंजुर केला आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

रासने म्हणाले, या निर्णयामुळे स्वच्छ सेवा संस्थेच्या कचरा वेचक कर्मचार्याना ८६ हजार ४०० मदर बॅग, तीन हजार चारशे पादत्राणांचे जोड आणि सात हजार दोनशे स्क्राप उपलब्ध होणार आहेत. त्याचा उपयोग या कर्मचार्यांच्या आरोग्याची काळजी आणि सुरक्षिततेसाठी होणार आहे.

Leave a Reply