ऑडी इंडियाने आकर्षक रूपातील ‘ऑडी क्यू५’ लॉन्च केली

मुंबई : ऑडी या जर्मन लग्झरी कार उत्पादक कंपनीने आज आपल्या ऑडी क्यू५च्या भारतातील लाँचिंगची घोषणा केली. ऑडी क्यू५ मध्ये स्पोर्टी वैशिष्ट्ये आणि दैनंदिन वापराची योग्यता यांचा मिलाफ साधण्यात आला आहे तसेच या कारमध्ये इन्फोटेनमेंट आणि असिस्टन्सचेही अनेक पर्याय आहेत. ऑडी क्यू५ नेहमीच तिचे आकारमान, कामगिरी व उपकरणे यांच्या अचूक मिलाफासाठी प्रसिद्ध राहिली आहे. या अत्यंत यशस्वी मॉडेलच्या बाह्यरचनेला एक धारदार स्वरूप दिल्यामुळे क्यूची ओळख अधोरेखित झाली आहे आणि क्वात्रोची अंगभूत वैशिष्ट्ये त्यात सामावली गेली आहेत.

ऑडी क्यू५ मध्ये, २४९ हॉर्सपॉवर ऊर्जा व ३७० एनएम टॉर्क निर्माण करणाऱ्या २.० लिटर टीएफएसआय इंजिनची शक्ती आहे. औरंगाबादमधील एसएव्हीडब्ल्यूआयपीएल कारखान्यात तयार झालेली ऑडी क्यू५ प्रीमियम प्लस आणि टेक्नोलॉजी या दोन व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असून यांची एक्स शोरूम किंमत अनुक्रमे ५८,९३,०००/- रुपये आणि ६३,७७,०००/- रुपये आहे.

ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीरसिंग धिल्लन या लाँचबद्दल म्हणाले, “आज आम्ही २०२१ मधील आमचे ९वे उत्पादन बाजारात आणले आहे आणि याहून अधिक आनंदी आम्ही असूच शकत नाही. ऑडी क्यू५ अगदी पूर्वीपासून आमच्या सर्वाधिक विक्रीच्या गाड्यांपैकी एक आहे आणि हे मॉडेलही अशीच कामगिरी करेल, याबद्दल आम्हाला आत्मविश्वास आहे. अतिरिक्त सुधारणांच्या माध्यमातून ऑडी क्यू५ मध्ये लग्झरी, स्पोर्टीनेस, आराम आणि दैनंदिन वापरासाठी योग्यता यांचा अचूक संयोग साधण्यात आला आहे.”

धिल्लन पुढे म्हणाले, “२०२१ हे वर्ष ऑडी इंडियासाठी उत्तम राहिले आहे. आमची विक्री वर्षाच्या पहिल्या १० महिन्यात १०० टक्क्यांहून अधिक वाढली आहे आणि ऑडी क्यू५ बाजारात आल्यामुळे ही वाढ आणखी पुढे जाईल, असा आत्मविश्वास आम्हाला वाटतो. या वर्षाची सांगता उच्च स्तरावर करण्यासाठी आम्ही सज्ज होत आहोत आणि आणखी काही महत्त्वाची मॉडेल्स २०२२ मध्ये बाजारात आणण्यासाठीही तयारी करत आहोत.”

Leave a Reply

%d bloggers like this: