पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची विजतोड थांबवली जावी भाजपची महावितरणकडे मागणी

पुणे: पुणे जिल्ह्यात सध्या पेरणीचा हंगाम सुरु आहे. बर्याच ठिकाणी शेतकऱ्याची गव्हाची लागवड, कांद्याची लागवड चालू आहे. महावितरण खात्याकडून कुठल्याही शेतकऱ्यांना वेळेवर विज वाटप नसताना देखील त्यांची विज तोडणी चालू आहे तसेच महावितरण जे लोडशेडींग बाबत वेळापञक दिले आहे त्या वेळापञकानुसार लोड शेडिंग पाळले जात नाही. महावितरण ला निवेदना व्दारे केली की महावितरण ने सदर बाबीची दखल घेऊन पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विजेबाबतचा प्रश्न सोडवावा अन्यथा सदर मागणीबाबत चा प्रश्न सोडवावा म्हणून भारतीय जनता पार्टी सर्व जिल्हा पदाधिकारी व पश्चिम महाराष्ट्राच्या वतीने मोठे आंदोलन केले जाईल असे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी इशारा केला.

पुणे येथे तालेवार, मुख्य अभियंता विज वितरण रास्ता पेठ पुणे यांना भाजपा च्या वतीने निवेदन देऊन शेतकऱ्यांना दिवसा विजपुरवठा करून लोडशेडींग बंद करावे व बील थकल्याने शेतकऱ्यांचे कनेक्शन बंद करू नये तसेच डी. पी.बंद करू नये या मागण्यांसाठी निवेदन दिले

यावेळी सरचिटणीस धर्मेद्र खांडरे, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव, हवेली तालुका माजी. अध्यक्ष रोहीदास शेट उंद्रे, पुणे जिल्हाध्यक्ष कायदा आघाडी ॲड. संजय सावंत पाटील,  माऊली चवरे, यांच्यासह सर्व पुणे जिल्हा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: