अभाविप ने दिले गोंडवाना विद्यापीठ परीक्षा नियंत्रकांना निवेदन

गडचिरोली : परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत वाढ करण्या बाबत परिक्षा नियंत्रक यांना निवेदन देण्यात आले व दोन्ही मागण्या मंजूर करण्यात आल्या.
गोंडवाना विद्यापीठमध्ये २२ नोव्हेंबर रोजी झालेल्या काम बंद आंदोलन मुळे बरेच विद्यार्थी काल परीक्षा फॉर्म भरू शकले नाहीत व महाविद्यालय मध्ये परीक्षा फॉर्म भरण्यास आलेल्या विद्यार्थ्यांची गर्दी बघता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गडचिरोली च्या वतीने परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत वाढ करण्याबाबत व विद्यापिठ वेबसाईट ( स्टूडेंट लॉग इन) बंद असल्याने बरेच विद्यार्थी मार्कशीट डाऊनलोड करू शकत नाही आहेत. या विषयावर निवेदन देण्यात आले व दोन्ही मागण्या मंजूर करुन परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत वाढ करण्यात आली जयेश ठाकरे नगर मंत्री,अभिषेक देवर प्रांत सहमंत्री धनपाल बोरघरे, यश गंडाटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

%d bloggers like this: