व्यक्तीच्या अपघाती मृत्युने कुटुंब उध्वस्त होते,म्हणुन वाहतुक नियम पाळा – आशिष कवठेकर

पुणे : रस्ते अपघात होतो तेव्हां एक आनंदी घर बाॅम्ब पडल्या सारखे उध्वस्त होते.यासाठी वाहन चालकांनी माझे कुटुंब – माझी जबाबदारी या जाणीवेतुन वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन वाहन चालविणे अत्यंत गरजेचे आहे.असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर यानी स्मरणदिन कार्यक्रमात रस्ते अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहताना केले.
वाहन चालकांनी आपल्या बरोबरच पादचार्‍यांच्या जिवाचा विचार करावा आणि वाहतुक नियमाचे सतत पालन करावे असे आवाहन अॅक्टीव्ह फौंडेशनचे संस्थापक श्रीकांत लिपाने यानी याप्रसंगी केले.

रस्ते अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ २१नोव्हेंबर हा स्मरण दिन म्हणुन श्रद्धांजली दिवस साजरा केला जातो,त्याचाच एक भाग म्हणुन आंबेगांव खुर्द येथील महेश ड्रायव्हींग स्कुल मार्फत स्मरण दिना निमित्त आयोजीत एका  कार्यक्रमात दत्तनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर यांचे हस्ते आणि अॅक्टीव्ह फौंडेशनचे संस्थापक श्रीकांत लिपाने यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात मेणबत्या प्रज्वलीत करुन श्रद्धांजली वाहण्यांत आली.

अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन प्रादेशिक परीवहन कार्यालय पुणे आणि महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कुल मालक संघटना यांचे संयुक्त विद्यमाने दरवर्षि नोव्हेंबर महिन्याच्या तिसरया रविवारी घेतला जातो.याचाच एक भाग म्हणुन हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास चंद्रकांत आ.गुरव, अध्यक्ष,ज्येष्ठ नागरीक संघ,आंबेगांव खुर्द,डाॅ. दिपक जरांगे,पराग जांभळे आणि महेश ड्रायव्हिंग स्कुलचे प्रतिनिधी सचिन देशमुख,विनायक कुलकर्णी,शिवम घोडके,प्रणिता आणि संध्या निकम हे उपस्थीत होते

Leave a Reply

%d bloggers like this: