पुणे शहर काँग्रेस ओबीसी विभाग शहराध्यक्ष पदी प्रशांत सुरसे

पुणे – पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाच्या शहर अध्यक्षपदी प्रशांत विष्णु सुरसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र सुरसे यांना मुंबई येथील पक्ष कार्यालयात सोमवारी देण्यात आले.

काँग्रेस पक्षाची जबाबदारीची पदे यापूर्वी सुरसे यांनी सांभाळली आहेत. महाराष्ट्र प्रदेश, एनएसयूआयचे सहसचिव, पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि शहराचे सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. पुणे शहर-जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे ते उपाध्यक्ष होते. सध्या पुणे शहर काँग्रेसचे सचिव या पदावर ते कार्यरत आहेत. येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या शासकीय समितीचेही ते सदस्य होते. युवक प्रतिष्ठानचे ते संस्थापक अध्यक्ष असून डॉ. विजयराव बोरावके मल्टीस्टेट को.ऑप.सोसायटीचे ते सदस्य आहेत.

काँग्रेसची संघटन मजबूत करून ओबीसींचे प्रश्न सुरसे मांडतील आणि ओबीसींना न्याय मिळवून देतील, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेजी यांनी सुरसे यांना नियुक्तीचे पत्र दिल्यावर बोलताना सांगितले.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी सुरसे यांचे अभिनंदन केले असून, ते पदाला न्याय देतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

काँग्रेसच्या संघटन बांधणीला प्राधान्य देऊ, असे प्रशांत सुरसे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे आदी नेत्यांचे सुरसे यांनी आभार मानले आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: