शाहीद कापूरच्या ‘जर्सी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; पुढील महिन्यात ‘या’ दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित 

कबीर सींग सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट केल्यानंतर बॉलीवूड अभिनेता शाहीद कपूर यांच्याकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शाहीद कपूर आता ‘जर्सी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून पुढील महिन्यात ‘जर्सी’ हा 31 डिसेंबर 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे.

काल शाहिद कपूरने सोशल मीडियावर त्याच्या ‘जर्सी’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. तर आज या चित्रपटाचा ट्रेलर  रीलीज करण्यात आला आहे. शाहिद कपूरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ‘जर्सी’ सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे. सिनेमाच्या पोस्टरमध्ये पांढऱ्या रंगाची ‘जर्सी’ घातलेला एक क्रिकेटर स्टेडियममध्ये क्रिकेटची बॅट हवेत फिरवताना दिसत आहे.

‘जर्सी’ हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट ‘जर्सी’चा हिंदी रिमेक आहे. यामध्ये एक क्रिकेटर व त्याच्या मुलांची भावस्पर्शि कथा दाखवण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार झाला असून पुढील महिन्यात 31 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: