Wednesday, May 6, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आमरावतीपासून एसटी संपापर्यंत महाराष्ट्राला आग लावण्याचे प्रयत्न चालले आहेत – संजय राऊत

मुंबई : महाराष्ट्रातील वातावरण कोण भडकवतेय? आणि का भडकवतेय? त्यामागील हेतू काय आहे, हे सर्वांना माहित आहे. एसटीच्या संपात तेल ओतण्याचं काम कोण आणि का करतेय? यासंदर्भात आमच्याकडे माहिती आहे. आमरावतीपासून एसटी संपापर्यंत महाराष्ट्राला आग लावण्याचे प्रयत्न चालले आहेत, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानी आंदोलकांकडून शाईफेक झाली. या पार्श्वभूमीवर राऊत प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये बैठक झाल्यानंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ‘एसटी कर्मचाऱ्यांविषयी सर्वांना सहानभूती आहे. पण त्यातही आग लावली जातेय. आग कोण लावतेय, हे सर्वांना माहित आहे. महाराष्ट्रातील, राजकीय आणि एसटी संपासह विविध विषयांवर शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली. एसटीचा विषय गंभीर आहे. लवकरच त्यावर तोडगा निघेल, याची मला खात्री आहे. एसटी संपाबाबतच्या आपल्या भूमिकावरुन शरद पवार यांनी परिवाहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चेनंतर एसटी संपाबाबत तोडगा निघेल, अशी आशा आहे,असे संजय राऊत म्हणाले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांविषयी सर्वांना सहानभूती आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी जे जे करता येईल, ते सरकार करतेय. सोमवारी शरद पवार, अनिल परब आणि अजित पवार यांच्यामध्ये या विषयावर चर्चा झाली आहे. आज शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मला असं समजलं की, शरद पवार यांनी काही सकारात्मक सूचना दिल्या आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

पहाटेच्या शपथविधीचे चंद्रकांत पाटील यांना झटके
नवीन वर्षांमध्ये राज्यातील सरकार जाणार आहे आणि गुडीपाडव्याला राज्यात नवीन सरकार येणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले, याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता ते म्हणाले की, ‘ हे सरकार जाईल म्हणून चंद्रकांत पाटील यांनी आतापर्यंत 28 वेळा विधान केलं आहे. त्यांना बोलत राहू द्या. चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्यानं सरकार जात नाही, हे सर्वांना माहित आहे. ते भाजपचे प्रदेक्षाध्यक्ष आहेत. त्यांना असं बोलणं गरजेचं आहे. हे सरकार पुढील 25 वर्ष टिकेल असा विश्वास आहे. ’ पहाटेच्या शपथविधीला आज दोन वर्ष झाले आहेत. याच शपथविधीचे झटके चंद्रकांतदादा पाटील यांना बसत असतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading