प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या घटस्फोटाची चर्चा
माजी मीस वर्ल्ड आणि अभिनेत्री प्रियांका प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास यांच्या घटसपोटाची सध्या सोशल मिडियावर चर्चा सुरू आहे. प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या नावामधून जोनास हे आडनाव काढून टाकले अन् त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या.
प्रियांकाने निक जोनाससोबत 2018 साली मोठ्या थाटामाटात लग्न केले होते. त्यानंतर प्रियांकाने तिचे नाव ‘प्रियांका चोप्रा’ बदलत ‘प्रियांका चोप्रा जोनास’ ठेवले होते. पण तेच नाव आता प्रियांकाने तिच्या ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटवरून हटवल्याने दोघांच्या घटस्फोटा विषयी चर्चा सुरू झाल्या आहेत.
घटस्फोटाच्या चर्चेवर मधु चोप्रा यांचे स्पष्टीकरण
प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या संबंधांबद्दल अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. यावर स्पष्टीकरण देत मधु चोप्राने सोशल मीडियावर लिहिले आहे,”प्रियांका चोप्रा आणि निकचं नातं तुटलेलं नाही. कृपया अशा अफवा पसरवू नका. दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे.
निक जोनासच्या व्हीडिओवर प्रियांकाची प्रेमळ कमेंट
घटस्फोटाची चर्चा झाल्यानंतर निक जोनासने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फिटनेस व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो जिममध्ये डंबेल उचलून व्यायाम करताना दिसत आहे. घटस्फोटाच्या चर्चांची पर्वा न करता निक या व्हिडीओमध्ये त्याच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करत आहे. निकच्या या व्हिडीओवर पत्नी प्रियांकाची प्रेमळ कमेंट केली आहे. प्रियांकाने लिहिले आहे की , ‘Damn! I just died in yours arms…’. निक जोनासच्या या व्हिडीओने या सर्व बातम्यांना पूर्णविराम दिला आहे.
