चर्चेच्या माध्यमातून एसटी कर्मचारी आणि राज्य सरकार संपावर मार्ग काढतील – अब्दुल सत्तार

पुणे : एसटी कर्मचाऱ्यांचे विलगीकरण केले नाही म्हणून एसटी कर्मचारी हे मागच्या महिन्याच्या 28 तारखेपासून संपावर आहेत. संप चालू असल्यामुळे भाजपचे नेते राज्य सरकारवर टीका करत आहेत. गोपीचंद पडळकर ,किंवा सदाभाऊ खोत या आंदोलनात तेल टाकण्याचं काम करत आहेत. राज्य सरकार निर्णय घेत नसल्यामुळे अजून एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे . त्यावर चर्चेच्या माध्यमातून एसटी कर्मचारी आणि राज्य सरकार यातून नकीच मार्ग काढतील, असा विश्वास  राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. तसेच गेले 5 वर्ष भाजपच सरकार असताना त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना राज्यशासनात का समाविष्ट करून घेतलं नाही ? असा प्रश्नही उपस्थित केला.   

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे सारखे महा विकास आघाडी सरकार वर हे सरकार जास्त काळ टिकणार नाही त्यावर सत्तार म्हणाले, चंद्रकांत दादा जेष्ठ नेते आहेत त्यावर टीका टिपणी करण योग्य नाही.  मात्र ते देव पाण्यात घालून बसले आहेत आणि त्यांना वाटत की कधी तरी सरकार पडेल पण अस काही होणार नाही. हे सरकार 5 वर्ष टिकेल. 

दंगल घडवणारे जे कोण अपराधी असतील ते रझा अकादमीचे असो की भाजप पुरस्कृत काही संगटना असतील त्याच्यांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश सरकार ने दिला आहे.  दंगल घडवणारे भाजप चे पुरुसूरक्त संघटना आहे , असा आरोप अब्दुल सत्तार यांनी भाजपवर केला आहे . भारतीय जनता पार्टीला काही दंगल विषयामध्ये घेणे देणे नाही .
विरोध ला विरोध करून जे पुन्हा एक मोर्चा निगतो त्यानंतर तोफोड होते ते काय कोणाला लेसेन दयची गरज नाही, असेही  अब्दुल सत्तार म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: