काइनेटिक इंजिनियरींग लिमिटेडची नफ्याची परंपरा कायम, निव्वळ नफ्यात१९० टक्क्यांची वाढ
पुणे : ऑटोमोबाईल बाजारपेठेतील एक मोठे नाव म्हणजेच काइनेटिक इंजिनियरींग लिमिटेड- कंपनी. कोरोना नंतरच्या काळात कायनॅटिक ने सातत्याने आपली फायद्याची परंपरा कायम राखत या तिमाहीतही नफा नोंदवला आहे. अतिशय नवीनतम उर्जेसह आणि कामाला वाहून घेतल्यामुळे काइनेटिक आता बाजारपेठेतील आघाडीचे खेळाडू बनले आहेत.
दुसर्या तिमाहीत कंपनीने एकूण उत्पन्नात मोठी वाढ नोंदवली असून ही वाढ ५६ टक्के इतकी आहे म्हणजेच गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत रू २१.६८ कोटींवरून हे उत्पन्न रूपये ३२.७१ कोटींवर गेले. याच तिमाहीत ईबीआयटीडीए मध्ये सुध्दा १३६ टक्क्यांची वाढ होऊन ते रू १.६३ कोटीं वरून ३.८४ कोटींवर गेला. दुसरीकडे जून २०२१ रोजी संपलेल्या मागील तिमाहीत एकूण उत्पन्नात १७ टक्के वाढ होऊन ते रू २८.११ कोटींवरून रू ३२.७१ कोटींवर केले तर ईबीडीआयटीए ७ टक्क्यांनी वाढून रू ३.५७ कोटींवरून ३.८४ कोटी झाला. एकीकडे लोकांना आपली पावले स्थिर करतांना त्रास होत असतांनाच काइनेटिक ने मागणीच पूर्ण केली नाही तर त्याच बरोबर कंपनीच्या सेवांमध्ये ही वाढ नोंदवली आहे.
सतत नफा मिळवण्याची आपली परंपरा कायम राखत कंपनीने सलग तीन तिमाहीत निव्वळ नफा नोंदवला असून ही वाढ तिमाहीच्या तुलनेत १९० टक्के इतकी आहे म्हणजेच २० लाख रूपयांवरून नफा रू ५८ लाखांवर गेला आहे. गेल्या आर्थिक वर्षांतील रू १६८ लाखांचा तोटा भरून काढून हा नफा झाला असून यांतून कंपनीचे वाहून घेणे, कष्ट आणि वेळेत पुर्नगठन करण्याची क्षमता दिसून येते. यांतून हे ही अधोरेखित होते की कंपनी ने दीर्घकालीन आणि सुधारीत बदल केल्यामुळे नफा प्राप्त होऊ शकला.
काइनेटिक इंजिनियरींग लिमिटेड चे एमडी अजिंक फिरोदिया यांनी सांगितले की, त्यांनी निवडलेला मार्ग योग्य होता आणि ही आकडेवारी त्याचेच प्रतीक आहे. “ केईएलची वाढ आणि लाभान्वित होण्याच्या प्रक्रियेतील सातत्य पाहून आंम्हाला आनंद होत आहे. आम्ही १०० टक्के भारतात विकसित केलेल्या इलेक्ट्रिक ॲक्सेलला उदंड प्रतिसाद मिळाला आणि मला खात्री आहे की आता अनेक उत्पादक हे चीन मधून आयात केलेल्या उत्पादनां पेक्षा चांगल्या गुणवत्तेच्या स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देतील. मला खात्री आहे की यामुळे केईएलच्या वाढीस आणखी चालना मिळू शकेल.”
