फेसबुकवर नव्हे तर ‘फेस टू फेस’ भेटणे गरजेचे – फ. मु. शिंदे

पुणे : जेष्ठ कवी फ. मु. शिंदे यांच्या ‘मनातले मुक्त काही’ या कविता संग्रहाचे प्रकाशन जेष्ठ नेते व विचारवंत उल्हासदादा पवार यांच्या शुभहस्ते नुकतेच पार पडले. प्रतिमा पब्लिकेशन्स पुणे व प्रकाशक डॉ. दीपक चांदणे यांची निर्मिती असलेला हा संग्रह आहे. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ कवियत्री लीला शिंदे उपस्थित होते. तसेच जेष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, सुनील महाजन, कवी उद्धव कानडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली.

फ. मु. शिंदे यावेळी बोलताना म्हणले की ‘मनातले मुक्त काही’ हा कविता संग्रह रसिकांच्या समोर आणताना मनापासून आनंद होत आहे. आजच्या विज्ञानाच्या काळात आपण रोज फेसबुक आणि इतर सोशल माध्यमातून एकमेकांना भेटतो. मात्र आपण फेस टू फेस भेटणे गरजेचे आहे. मनातील मुक्त काही रसिकांच्या मनाचा ठाव घेईल असं मला वाटते.

उल्हास पवार बोलताना म्हणाले की ७० च्या दशकपासून फ. मु. शिंदे यांच्याशी माझा परिचय आहे. फ मु यांची कविता ही प्रत्येक माणसाला समृद्ध करणारी आहे. त्यांच्या निसर्गावरील कविता, प्रेम कविता अशा अनेक त्यांच्या कविता मनाला आज ही भिडतात. पवार पुढे म्हणाले की फ मुचें हा ३४ वा काव्यसंग्रह आहे. ८७ व्या सासवड साहित्य संमेलनचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.

प्रास्ताविक प्रसंगी बोलताना डॉ. दीपक चांदणे म्हणाले की गेल्या पन्नास वर्षांपासून फ. मु. शिंदे यांचे
मराठी साहित्यातील योगदान मोठे आहे. त्यांचा ८० पानांचे संग्रह आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मिता चांदणे यांनी केले. तर ऋचा शिंदे यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: